Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राजस्थानमध्ये बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. डिझेल संपल्यामुळे बस एका उड्डाणपुलावर उभी होती. तेवढ्यात मागून भरधाव ट्रेलर आला आणि त्यानं बसला जोरदार धडक दिली. ही बस भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होती. या अपघातात सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.

जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुजरातच्या भावनगरहून बस जयपूर आणि भरतपूरमार्गे मथुरेला चालली होती.पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला. बसमधले सर्व प्रवासी हे गुजरातमधील भावनगरहून मथुरेला जात होते. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com