Rajasthan School Girl
Rajasthan School Girl

Rajasthan School Girl: 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील एका शाळेत 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Rajasthan School girl)राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील एका शाळेत 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील शाळेत ही घटना घडली आहे. ही विद्यार्थींनी इयत्ता चौथीत शिकत होती.

एका तासात 2 वेळा हा मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. मधल्या सुट्टीत खाऊचा डबा उघडला आणि तिला हृदयविकाराचा झटका आला.मंगळवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली.

विद्यार्थीनीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तिथे त्या मुलीला दुसरा हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे.त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना विद्यार्थीनीचा मृत्यू झाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com