उद्धव ठाकरे यांच्या राज ठाकरेंवरील टीकेवर राजू पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

उद्धव ठाकरे यांच्या राज ठाकरेंवरील टीकेवर राजू पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरुन उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. काही जणांनी भाजपला विरोध करण्याचे नाटक करुन, ढोंग करुन पाठिंबा दिला. लढण्याचे नाटक करुन केलं. आम्ही नाटक करणारी माणसं नाहीत. नाटक ही सुद्धा कला आहे. ती कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही.

याच पार्श्वभूमीवर आता राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू पाटील म्हणाले की, कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले 'शर्त" आणि 'शर्ट' असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतं? असे राजू पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com