Raju Shetti
Raju Shetti

मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं तरी ते फक्त दही हंडीच फोडतायेत - राजू शेट्टी

सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत आहेत. अनेक जणांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ टोला लगावला आहे.

सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत आहेत. अनेक जणांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ टोला लगावला आहे. राजू शेट्टी म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत आहेत. महाराष्ट्रातील सरकार नेमकं कशासाठी बनले, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहला आहे. कारण सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे. याची किळस आता सामान्य माणसालाही येत आहे. असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे.

तसेच गणपतीच्या काळात घरा घरात जाऊन दर्शन घेत राहिले. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक असावं, उत्सव साजरा करावा, पण उत्सव साजरा करण्यापूर्वी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची आपल्यावर जबाबदारी आहे याचं भान ठेवलं पाहिजे. असे राजू शेट्टी म्हणाले. यासोबतच तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर शिक्के मारले ते नादान निघाले आहेत. ते काहीच करत नाहीत. सरकारच्या विरोधात काही जणांची बोलण्याची हिंमत नाही. त्यामुळं मला मैदानात उतराव लागत असल्याचे शेट्टी म्हणाले. एवढा मोठा पाऊस पडला, जमिनी वाहून गेल्या, शेती पिकं वाया गेली. तरी महसूल खात्यान घरात बसून पंचनामे केले. कृषी अधिकारी शिवारात फिरकले नाहीत याचा हा परिणाम आहे. त्यांना जाब विचारणार कोण. अजूनही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्रीच नाहीतर आढावा कोण घेणार? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

गेल्या दोन महिन्यात राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे. जनावरांवर लम्पीसारखा आजार आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यंत्रणा कामाला लावण्याची जवाबदारी पालकमंत्र्यांची असते. मात्र, जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळाले नाहीत. यामुळं या सरकारचे अस्तित्व शून्य झाले असल्याचे शेट्टी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com