ताज्या बातम्या
Raju Shetti : पालकमंत्री पदावरून राजू शेट्टी यांची जोरदार टीका; म्हणाले...
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे.
राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, विक्रमी बहुमत मिळूनसुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाहीत. म्हणजे हे बहुमत हे बेगडी आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं या पलिकडे सरकारने काही केलेलं नाही आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, जनतेनं जो कौल दिला आहे त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. म्हणून जनतेनंसुद्धा सावध राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताची काळजी घेणारे लोक निवडून आले पाहिजे. असे राजू शेट्टी म्हणाले.