Raju Shetti : मी तुमच्या शेतातला म्हसोबा; म्हसोबाला वर्षाला परडी सोडता मला 5 वर्षातून एकदातरी परडी सोडा

Raju Shetti : मी तुमच्या शेतातला म्हसोबा; म्हसोबाला वर्षाला परडी सोडता मला 5 वर्षातून एकदातरी परडी सोडा

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी लोकसभा लढवत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी लोकसभा लढवत आहेत. त्यांनी सांगलीच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भूमीत येऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी गावातून बैलगाडीमधून रॅली काढण्यात आली.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, प्रत्येकाच्या शेतामध्ये म्हसोबा आहे की नाही? म्हसोबा काय करतो आपल्या शेताची राखण करतो. मग ते राखण केल्याबद्दल वर्षातून एकदा आपण त्याला परडी सोडता की नाही. मी सुद्धा तुमच्या ऊसातील फडातला म्हसोबाच आहे. तुमच्या ऊसाच्या फडाचं राखण कोण करतंय. मीच करतोय ना. मी तुमच्या फडातला म्हसोबा आहे. मला पाच वर्षातून एकदा तरी परडी सोडा की.

यासोबतच राजू शेट्टी पुढे म्हणाले की, पाच वर्षातून एकदा परडी सोडायचं म्हणजे मला मत द्यायचं बाकी काही नाही. ते मत तुम्हालाच उपयोगाला येणार आहे. सामान्य माणसाचा आवाज संसदेपर्यंत पोहचणार आहे. ही संसद मुकी, बहीरी आणि आंधळी आहे. तिचे डोळे उघडायचे असतील, त्या संसदेला बोलायचं लावायचे असेल तर तसाच तगडा माणूस त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. असं राजू शेट्टी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com