ताज्या बातम्या
Nashik : रक्षाबंधन ठरलं अखेरचं! बिबट्याने केली भावाबहीणीच्या नात्याची ताटातूट
नाशिक: रक्षाबंधनाच्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू, गावात शोककळा.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू असायला हवेत पण नाशिकमधील वडनेर दुमाला गावातील नऊ वर्षांच्या श्रेयासाठी रक्षाबंधनाचा दिवस कायमस्वरूपी काळा दिवस ठरला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तिचा लाडका भाऊ तीन वर्षांचा आयुष तिच्यापासून कायमचा दूर गेलाय. पूर्ण वडनेर दुमाला गावात यामुळे शोककळा पसरलीय...