अयोध्येवरून परतल्यावर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; १ कोटी घरांवर...

अयोध्येवरून परतल्यावर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; १ कोटी घरांवर...

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान सौर योजनेची घोषणा मोदींनी ट्विटरद्वारे केली आहे. घराच्या छतावर सौर यंत्रणा असावी हा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या योजनेंतर्गत एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवले जाईल, असे पंतप्रधानांनी म्हंटले आहे.

अयोध्येवरून परतल्यावर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; १ कोटी घरांवर...
सुप्रीम कोर्टाची शिंदेंसह 40 आमदारांना नोटीस, महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय घडणार?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू करेल. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीचा अभिषेक एका नव्या युगाच्या आगमनाचे प्रतीक असल्याचे म्हंटले आहे. राम अग्नी नसून ऊर्जा आहे. तो भारताचा आधार आणि विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com