Ramdas Athawale
Ramdas AthawaleTeam Lokshahi

खासदार संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर आहे - रामदास आठवले

खासदार संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही.

संजय देसाई, सांगली

खासदार संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही. राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांच सरकार 2024 पर्यन्त कार्यकाळ पूर्ण करेल. आणि 2024 ला परत आमची सत्ता येणार आहे. असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तोडण्याची यात्रा आहे. पहिला काँग्रेस जोडा, राहुल गांधी पंतप्रधान होणे अश्यक्य आहे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही. कारण भीम शक्ती माझ्या कडे आहे. शिंदे यांच मोठं बंड आहे. शिवाय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात जागा वाटपा मध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही.

छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आहेनिमित्त, ५ आणि ६ मे तारखेला कोल्हापूरला आर पी आयच अधिवेशन आयोजित केले आहे.. ६ तारखेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com