Ramdas Athawale On Thackeray Bandhu
Ramdas Athawale On Thackeray BandhuRamdas Athawale On Thackeray Bandhu

Ramdas Athawale On Thackeray Bandhu : ठाकरेबंधूच्या युतीवरुन रामदास आठवलेंचे मोठं विधान, म्हणाले...

राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Ramdas Athawale On Thackeray Bandhu) राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आपापल्या रणनीती ठरवत आहेत. ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय (आठवले गट) चे प्रमुख रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर टीका केली आहे. राज ठाकरे यांना सोबत घेणे ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सांगली दौऱ्यावर असताना आठवले म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंचे नुकसान होईल. दोघे एकत्र आल्यामुळे मुंबईतील अमराठी मतदार महायुतीकडे वळतील, तर मराठी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे त्याचा फायदा सत्ताधारी आघाडीला होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

थोडक्यात

  • राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत.

  • सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आपापल्या रणनीती ठरवत आहेत.

  • ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com