“नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…” : रामदास कदम

“नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…” : रामदास कदम

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण एकदम ढवळून निघाले आहे. अशातच शिवसेनेत सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले.

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेनेत सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले. शिवसेना नक्की कोणाची? हा वाद आता कोर्टाच्या दरबारी आहे. परंतु, शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार आरोप- प्रत्यारोप होत असताना आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला. या मेळाव्यात शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, “तुम्हाला सांगतो ही सभा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन तू पुढं चालं माझे आशिर्वाद तुला आहेत. हे बाळासाहेब वरुन सांगत असतील,”

अंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ. मग बायको आल्यावर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते. म्हणजे खोके काय असतील ते कळेल,”

आंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ. मग बायको आल्यावर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते. म्हणजे खोके काय असतील ते कळेल,” असे रामदास कदम म्हणाले.

Lokshahi
www.lokshahi.com