Ramraje Naik Nimbalkar On Satara Doctor Suicide Case : "CDR काढल्यास..." साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य
साताऱ्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. गुरुवारी 23 ऑक्टोबरला पीडित महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहत आपल्या आत्महत्येच कारण स्पष्ट केलं होत. यानंतर कालपासून सुरु झालेल्या तपासणीसंदर्भात अनेक नवीन नवीन मुद्दे समोर आले आहेत.
ज्यामुळे या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. याचपार्श्वभूमिवर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल या प्रकरणावर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून, संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान यावर रामराजे निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"या घटनेने फलटण ची बदनामी झाली आहे हे सर्वांना माहीत आहे. CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल. मुखमंत्र्यावर तपासाबाबत माझा विश्वास आहे. या घडलेल्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करतो. पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटता आले असते तर बरे झाले असते. मला कोणावरही आरोप करायचे नाहीत. या आधी फलटण तालुक्यात सरकारी लोक आवर्जून या भागात बदली मागायचे. दरम्यान, या घटनेने फलटणची बदनामी झाली असून, पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटता आलं असतं तर बरं झालं असतं", असं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल आहे.
नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी 23 ऑक्टोबरला साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. डॉ. संपदा मुंडे असं त्या महिला डॉक्टरच नाव असून काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. ”माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” अशी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. अखेर गुरुवारी रात्री डॉ. संपदा मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, "PSI गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला". या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलिस प्रशासनात शोककळा पसरली आहे.

