ताज्या बातम्या
Kolhapur :कोल्हापूरमध्ये रंगपंचमीचा उत्साह; तरुणाईचा जल्लोष
कोल्हापूरमध्ये रंगपंचमीचा उत्साह; तरुणाईचा जल्लोष, विविध पेठा आणि गल्लीबोळात रंगांची उधळण
हिंदू धर्मात होळी हा सण वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. रंगपंचमी हा सण होलीका दहनाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा रंगपंचमी 19 मार्चला साजरी करण्यात आली आहे. रंगपंचमीला श्री पंचमी किंवा देव पंचमी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी एकामेकांवर रंग- गुलालाची उधळण केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी मित्र- परिवार, नातेवाईक गुलाल आणि विविध रंग लावून रंगपंचमी साजरी करतात.
राज्यात रंगपंचमीचा सण उत्साहाने साजरा होत आहे. कोल्हापूरमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोल्हापूरमधील विविध पेठा आणि गल्लीबोळामध्ये हा सण साजरा होत आहे. त्यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समावेश असून एकामेकांना रंग लावून रंगपंचमीचा सण साजरा करत आहे.