Sanjay Raut : मतदार याद्यातील घोळावर राऊतांनी आयोगाला धरलं धारेवर

Sanjay Raut : मतदार याद्यातील घोळावर राऊतांनी आयोगाला धरलं धारेवर

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग हा भाजपची अतिरिक्त शाखा असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढवला. गेल्या दोन दिवसात विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे गेले.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले

  • निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंडेड शाखा

  • गु्न्हेगारीसारखं काम सुरु असल्याचं दाखवणं हे आमचं कर्तव्य

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग हा भाजपची अतिरिक्त शाखा असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढवला. गेल्या दोन दिवसात विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे गेले. मतदार याद्यातील घोळावर त्यांनी आयोगाला धारेवर धरले. त्यानंतर आज राऊतांनी आयोगासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली.

मतदार याद्यांतील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगासोबत दोन दिवस बैठक झाली. निवडणूक याद्याच बोगस असतील तर त्या याद्यांना महत्त्व काय. ते मतच जर चुकीच्या पद्धतीने जात असतील तर त्याला अर्थ काय. आम्ही जे आरोप करतोय त्यावर आयोग उत्तर द्यायला तयार नाही. अशावेळी जर भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा. त्या निर्दोष करा, तर त्यात काय चुकीचं आहे, असा सवाल राऊतांनी केला.

निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंडेड शाखा

निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे. जशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी वा अन्य संघटना आहे, त्याप्रमाणे निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. आमच्या राजवटीत असे नव्हते. निवडणूक आयोगातील माणसं जर भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर आम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार असा सवाल राऊतांनी केला. पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं आणि याद्यातील घोळावर, त्यात गु्न्हेगारीसारखं काम सुरु असल्याचं दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे, असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com