सत्तेत असताना अजित पवारांनी का मेळघाटचा दौरा केला नाही - राणा दाम्पत्यांचा सवाल

सत्तेत असताना अजित पवारांनी का मेळघाटचा दौरा केला नाही - राणा दाम्पत्यांचा सवाल

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर होते,दरम्यान त्यांनी मेळघाटातील कुपोषणाचा आढावा घेत आताच्या सरकारला जबाबदार धरले होते.

सूरज दहाट, अमरावती

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर होते,दरम्यान त्यांनी मेळघाटातील कुपोषणाचा आढावा घेत आताच्या सरकारला जबाबदार धरले होते, व कुपोषणाचा मुद्दा अधिवेशनात लावून धरू असेही पवारांनी काल सांगितलं होतं दरम्यान आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली, अजित पवार हे सत्तेत असताना त्यांनी मेळघाटचा दौरा का केला नाही असा पलटवार त्यांनी केला,

आता फक्त दोन महिने झाले आमची सत्ता आली की यापूर्वी अजित पवार झोपले होते काय असा सवाल राणा दाम्पत्याने उपस्थित केला, आता अजित पवार केव्हा कुपोषणाचा मुद्दा अधिवेशनात मांडतात यांची वाट आम्ही पाहत आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिला, मेळघाटातील बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो त्याची चौकशी सरकारने केली नाही तसेच मी मेळघाटातील कुपोषणाचा मुद्दा लोकसभेत मांडला होता असेही नवनीत राणा यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com