माफी न मागितल्यामुळेच राहुल गांधींवर कारवाई - रविशंकर प्रसाद
Admin

माफी न मागितल्यामुळेच राहुल गांधींवर कारवाई - रविशंकर प्रसाद

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पत्रकार परिषद घेत अदाणींच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पत्रकार परिषद घेत अदाणींच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, अदानीची शेल कंपनी आहे. त्यात 20 हजार कोटी कोणी गुंतवले? ते अदानीचे पैसे नाहीत. मी एवढाच प्रश्न विचारला होता. मी अदानी आणि मोदी यांच्या संबंधावर भाष्य केलं. म्हणून माझी खासदारकी रद्द केली गेली. असे राहुल गांधी म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांना प्रतिउत्तर दिले आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला होता. माफी न मागितल्यामुळेच राहुल गांधींवर कारवाई करण्यात आली आहे. अदानी प्रकरण आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा संबंध नाही. असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

तसेच राहुल गांधी आज पुन्हा खोटं बोलले. त्यांच्याविरोधात आणखी 6 केसेस आहेत. राहुल गांधींप्रमाणेच देशातील 32 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झालंय. राहुल गांधींविरोधात देशभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com