Ravikant Tupkar : माझं 22 वर्षाचं आयुष्य मी लोकांसाठी समर्पित केलेलं आहे, त्या कामाची मजुरी म्हणून लोकं मला निवडून देतील

Ravikant Tupkar : माझं 22 वर्षाचं आयुष्य मी लोकांसाठी समर्पित केलेलं आहे, त्या कामाची मजुरी म्हणून लोकं मला निवडून देतील

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रविकांत तुपकर म्हणाले की, बुलढाण्याच्या निकाल हा ऐतिहासिक असणार आहे. कारण प्रस्थापित नेत्यांवर जनतेचा प्रचंड राग आहे. 15 - 15 वर्ष खासदार असलेलं विद्यमान खासदार यांनी आतापर्यंत जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही आहे. याबाबतीत त्यांनी काहीही भूमिका आजपर्यंत घेतलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे.

आपल्यासाठी रस्त्यावर लढणारे शेतकऱ्याचे लेकरु संसदेमध्ये गेलं पाहिजे. अशी एक भावना सर्वसामान्य लोकांची आहे आणि लोकांनीच मला या निवडणुकीत उभं केलेलं आहे. लोक मला लोकवर्गणी देत आहेत. स्वखर्चाने लोक माझ्यासाठी फिरत आहेत आणि लोकांनी माझी निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे 100 टक्के सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचा विजय या निवडणुकीमध्ये निश्चित आहे. खरी लढत महायुतीच्या उमेदवारासोबतच माझी राहणार आहे. कारण लोकं म्हणतात पक्ष पाहिजे, काहीतरी मोठा नेता पाहिजे. असं नाही आहे. आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे मोठा नेताच पाहिजे, पक्ष पाहिजे, गॉडफादरच पाहिजे असं नाही.

सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. 22 वर्ष जो काही आम्ही संघर्ष केला. लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो. माझं 22 वर्षाचं आयुष्य मी लोकांसाठी समर्पित केलेलं आहे. त्या कामाची मजुरी म्हणून लोकं मला निवडून देतील. असा मला विश्वास आहे. सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मला मिळत असल्यामुळे सगळं हे दिग्गज नेते एका ठिकाणी आलं. जनता आता मात्र नेत्यांच्या हातात राहिलेली नाही आहे. जनता ही आमच्यासोबत राहणार आहे. असे रविकांत तुपकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com