Ravikant Tupkar Update : शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढणारे रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनाची तयारी
Published by :
Prachi Nate

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा, सोयाबीन कापूस भाव फरक, पीक विमा यासह अन्य मागण्या केल्या होत्या. मागण्यांबाबत तुपकरांनी सरकारला 18 मार्चचा अल्टिमेट दिली होता. तोपर्यंत मागण्या मान्य न केल्यास स्व. साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी 19 मार्च रोजी कर्जाचा बोजा असलेले शेतकऱ्यांचे सातबारे व सोयाबीन, कापूस अरबी समुद्रात बुडवू असा इशारा दिला होता. यानुसार आता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेकडो शेतकऱ्यांसह मुंबईत आंदोलन करणार असं म्हटलं होत. खालापूर येथील नढाल येथे सध्या रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह पोचले होते. मात्र या दरम्यान असंख्य पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला. मुंबईतील अरबी समुद्रात जाण्याच्या निर्णयावर तुपकर ठाम असल्याच त्यांनी म्हटलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com