Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार
Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धारRavindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार

Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार, नवीन पोस्ट व्हायरल

पुण्याचे महागनगरप्रमुख आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर हे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहारावर प्रश्न उठवले असून, भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

पुण्याचे महागनगरप्रमुख आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर हे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहारावर प्रश्न उठवले असून, भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावर भाजपकडून तक्रारींची चर्चा सुरु आहे. रविंद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांचा पाठिंबा कायम राहील, असे सांगितले आहे.

धंगेकरांनी काय लिहिलं आहे एक्स पोस्टमध्ये?

शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.

आणि पुन्हा एकदा सांगतो.....

भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही.

सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..!

दिवाळीनिमित्त त्यांनी पुण्यातील नागरिकांना समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धंगेकरांच्या भूमिकेबाबत विचारल्यावर त्यांनी "बॉस सोबत बोलेन" असे उत्तर दिले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत धंगेकर काँग्रेसचे उमेदवार होते, पण नंतर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आणि त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com