“नवीन वर्ष साजरं करणं ‘हराम’; रझा अकादमीच्या अध्यक्षांचं विधान

“नवीन वर्ष साजरं करणं ‘हराम’; रझा अकादमीच्या अध्यक्षांचं विधान

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर नववर्षाचे जोरदार आणि जल्लोषात साजरा करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर रझा अकादमीच्या अध्यक्ष सईद नुरी यांनी एक विधान केलं आहे. त्यांनी ट्विटरला एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मुलांना अशा अनैतिक कृत्य आणि निर्लज्जपणात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याकडे अजूनही वेळ आहे. आपण त्यांना अशा सेलिब्रेनमध्ये जाण्यापासून रोखले पाहिजे”. असे ते म्हणाले.

तसेच “वर्षाची शेवटची रात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३१ डिसेंबरला निर्लज्जपणाची हद्द ओलांडली जाते हे खेदजनक आहे. अशा पार्ट्यांमध्ये सेलिब्रेशनच्या नावाखाली कोणते अशोभनीय कृत्य केलं जात नाही. अशा वाईट कृत्यांमुळे सैतानालाही लाज वाटेल. अशा हराम प्रथा सर्व धर्माचे आणि जातीचे लोक करतात आणि विशेषत: मुस्लिम तरुण अशा हराम क्रियांमध्ये फार रस घेतात” असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com