RBI Repo Rate Update : RBI चा मोठा निर्णय! रेपो दर आता ५.२५%, शेअर बाजारात तेजी

RBI Repo Rate Update : RBI चा मोठा निर्णय! रेपो दर आता ५.२५%, शेअर बाजारात तेजी

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने आज रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला असून यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला तर आहेच. तसेच, गुंतवणूकदारांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने आज रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला असून यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला तर आहेच. तसेच, गुंतवणूकदारांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. आज भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, रेपो रेटमध्ये कपात तात्काळ लागू झाली आहे. या निर्णयामुळे रेपो रेट आता ५.५०% वरून अंदाजे ५.२५% पर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यासंबधित माहिती देत सांगितले की, रेपो रेटमध्ये कपात तात्काळ लागू करण्यात येईल. आरबीआयच्या या निर्णयामुळे नागरिकांचे गृहकर्ज ईएमआय कमी होईलच. तसेच, बँक कमी व्याजदराने कर्ज देखील देतील.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मागील महिना आमच्यासाठी एक मोठे आव्हान होते, परंतु येणारे महिने जीडीपी आणि महागाई दोन्ही बाबतीत चांगले असतील. संपूर्ण वर्षासाठी महागाईचा अंदाज २% आहे. दुसऱ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ ८.२% होती. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जीडीपी वाढ ८% राहण्याचा अंदाज आहे. या बैठकीत एमपीसी सदस्यांनी एकमताने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला. सीआरआर ३% वर ठेवण्यात आला, तर एसडीएफ दर ५.२५%, एमएसएफ दर ५.७५% आणि बँक दर ५.७५% वर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आरबीआयने १ लाख कोटी ओएमओ खरेदी आणि ५ अब्ज डॉलर्सची ३ वर्षांची अमेरिकन डॉलर्स किंवा भारतीय नुतन स्वॅप यांचा समावेश केला असून दोन्ही डिसेंबरमध्ये नियोजित आहेत.

२०२५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग ४ वेळा रेपो दरात कपात केली असून आरबीआयने रेपो दरात फेब्रुवारीमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली. त्यानंतर एप्रिलमध्ये, रेपो दरात आणखी २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आल्यानंतर जूनमध्ये देखील वर्षातील सर्वात मोठी कपात ५० बेसिस पॉइंट्सची होती. आणि आता मात्र, आणखी २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. एकूणच, या वर्षी रेपो दरात आरबीआयने १२५ बेसिस पॉइंट्स किंवा १.२५ टक्के कपात केली आहे. या वर्षीच्या कपातीपूर्वी, रेपो दर दोनदा स्थिर राहिला होता. तथापि, आता रेपो दर ६.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे. रेपो दर कपातीनंतर शेअर बाजारात देखील मोठी तेजी आली. आज सेन्सेक्स २०० अंकांपेक्षा अधिक वाढून ८५,५०० च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी ७५ अंकांनी वाढून २६,११० वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेने ३६४ अंकांची वाढ नोंदवली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com