RCB vs GT IPL 2025 : आरसीबीला सलग तिसऱ्या तर गुजरातला दुसऱ्या विजयाची संधी

RCB vs GT IPL 2025 : आरसीबीला सलग तिसऱ्या तर गुजरातला दुसऱ्या विजयाची संधी

आयपीएल २०२५ च्या १४ सामन्यात आरसीबी आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येत असून हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजराज टायटन्स यांच्यात बुधवारी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आयपीएलचा सामना रंगणार आहे. आरसीबीची धुरा यंदा रजत पाटीदार याच्या हातात असून गुजरात टायटन्सचे कर्णधारपद शुभमन गिल भूषवत आहे. गुजरात टायटन्सच्या टीममध्ये शुभमन गिलसोबत जोस बटलर, साई सुदर्शन हे उत्तम फलंदाज असून मधल्या फळीत उतरणार आहेत. तर आरसीबीने गेल्या हंगामानंतर संघात फेरबदल करत नव्या खेळाडूंना सामील केले आहे. त्यामुळे आजचा सामना कोणता संघ विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही वेळातच आरसीबी विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा १४ वा सामना सुरू होणार आहे.

यापूर्वी रविवारी गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात ३६ धावांसह गुजरातने मुंबईवर विजय मिळवला होता. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला १९६ धावांचे आव्हान दिले होते. मुंबई इंडियन्सने २० ओव्हरमध्ये १६० धावांचा पाठलाग करत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com