Shefali Jariwala Passed Away : शेफाली जरीवालाच्या आकस्मिक मृत्यूचे कारण उघड, पोलिस तपासात नवा खुलासा
"काटा लगा गर्ल" म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफाली जरीवालाचा शनिवारी कार्डियक अरेस्टमुळे अचानक मृत्यू झाला. तिच्या अश्या अचानक जाण्याने तिच्या नातेवाईक मित्रपरिवार आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अंत्यसंस्कारानंतर पती अभिनेता पराग त्यागीने तिच्या अस्थी विसर्जित केल्या आणि सर्व विधी पूर्ण केले. यादरम्यान पराग ह्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि त्याने अत्यंत दुःखद मनाने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यामध्ये पोलिसांच्या तपासात शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे उघड झाले आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी एक निवेदन सादर केले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेफालीचा मृत्यू बीपी BP Low झाला. शेफाली गेल्या काही दिवसांपासून सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. पोलिसांना तिच्या घरातून दोन व्हिटॅमिन सी आणि ग्लूटाथियोनच्या गोळ्या सापडल्या आहेत. मृत्यूच्या एक दिवस आधी शेफालीच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. या पूजेमध्ये दोघांचे आईवडील सहभागी झाले होते. त्यादिवशी शेफालीने एक दिवस उपवास देखील पाळला होता .यामुळे तिला थोडे अशक्तपणासारखे वाटत होते. त्यातच दुसऱ्या दिवशी शेफालीने फ्रिजमधील अन्न खाल्ले असावे.
आदल्या दिवशीचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी असे फ्रिजमधील शिळे अन्न खाणे याचा एकत्रित परिणाम तिच्यावर झाला. आदल्या दिवशीच्या कार्यक्रमामुळे तिला थोडा थकवाही जाणवत होता. त्यातच तिच्या व्हिटॅमिन सी आणि ग्लूटाथियोनच्या गोळ्या सुध्दा चालू होत्या. अशातच तिचा बीपी अचानक लो झाला आणि ती बेशुद्ध पडली. याच अवस्थेत तिला कार्डियक अरेस्टचा अटॅक आला. मात्र तिच्या पतीने तिला तात्काळ बेलेव्यू रुग्णालयात नेले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शेफालीला रुग्णालयात नेईपर्यत तिचा मृत्यू झाला होता.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सर्व सदस्यांची आणि तिचा नवरा पराग त्यागी यांच्या वक्तव्याची नोंद घेतली असून यामध्ये काही संशयास्पद आढळलेले नाही. सध्या पोलिसांनी शेफाली जरीवाला प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.