'...म्हणून मी मुख्यमंत्री झालो' - एकनाथ शिंदे
शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसले तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर अनेक आरोप करण्यात आले. अनेक प्रतिक्रिया आल्या. राजकीय वर्तुळातून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्यामागचं कारण सांगितले आहे. ठाण्यात राष्ट्रावादी काँग्रेसच्या ६ माजी नगरसेवकांनी काल रात्री बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. सहा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले की, जनता आपल्याला निवडून देते. त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत. लोकोपयोगी कामं व्हावीत, हाच माझा ध्यास आहे. “एकदा शब्द दिला की मी मागे फिरत नाही. तो शब्द पाळलाच जावा असा माझा अट्टहास असतो. म्हणून मी मुख्यमंत्री झालो. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.