Tamilnadu rains
Tamilnadu rains

Tamilnadu Rain: तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरसदृश्य स्थिती, दक्षिणेकडील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

ऐन हिवाळ्यामध्ये तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तामिळनाडूमधील दक्षिणेकडील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवार रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

कुठे बसला पावसाचा जास्त तडाखा?

बुधवारी रात्री सुरू झालेल्या दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाने गुरुवारी संपूर्ण प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं. भारतीय हवामान खात्याने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाची तीव्रता मध्यम होती. ज्यामुळे सखल भागात पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे तंजावर, तिरुवरूर, नागापट्टिनम आणि मायिलादुथुराई यांसारखे जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. रस्ते जलमय झाले आहेत आणि वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

पुंडी जलाशय परिसरात पुराचा इशारा

चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुशे जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाकडून (WRD) खबरदारी म्हणून पुंडी जलाशयातून 1,000 क्युक्युस पाणी कोसस्थलैयर नदीत सोडले आहे. नदीकाठच्या लोकांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.

तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे आणि पायाभूत सुविधांचंही नुकसान झाले आहे. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. IMD कडून दक्षिणेकडील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तामिळनाडूमधील स्थिती दाखवणारा व्हिडिओ पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रकाशित केला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com