Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती
Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती

Red Soil Story युट्यूबर शिरीष गवस यांचे निधन, कोकणातील जीवनशैलीचे दर्शन घडवणारा युट्यूबर गमावला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

डिजिटल विश्वातून अत्यंत दुखद घटना समोर आली आहे. कोकणातील खाद्य संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनशैलीचे सुंदर दर्शन Red Soil Story या युट्यूब चॅनेलच्या माध्यामातून घडवणारा प्रसिद्ध युट्यूबर शिरीष गवस यांचे केवळ वयाच्या 33 व्या वर्षी निधन झाले. यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिरीष आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी पारंपरिक कोकणी अन्न, घरगुती पिकवलेली भाजीपाला, ग्रामीण जीवनशैली यांचे दर्शन घडवत हजारो प्रेक्षकांची मने जिंकली होती. ते दोघं कोकणातील डिजिटल विश्वात एक प्रिय आणि ओळखलं जाणारं नाव बनले होते. शिरीष यांच्या निधनाची माहिती 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या युट्यूबर अंकिता वालावलकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली. काही दिवसांपासून शिरीष यांच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यावेळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि अखेर त्यांचे निधन झाले.

हे दु:खद निधन त्यांना वडील झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात घडले, त्यामुळे कुटुंबावरचा आघात अधिकच गंभीर ठरला आहे. आज सकाळी ११ वाजता दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाट्ये पुनर्वसन येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूर्वी मुंबईत स्थायिक असलेले शिरीष आणि पूजा यांनी कोविड काळात शहरातील धकाधकीचे आयुष्य सोडून कोकणात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. शिरीष यांनी मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी केली होती, तर पूजा या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून फाइन आर्ट्सची पदवीधर असून, पुण्याच्या FTII मधून प्रॉडक्शन डिझाईनचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी सात वर्षे बॉलिवूडमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले होते.

Red Soil Story हे केवळ युट्यूब चॅनेल न राहता, कोकणातील जीवनशैलीचं खिडकीसारखं माध्यम बनलं. स्वतःच्या शेतात शेती करणं, सेंद्रिय अन्न तयार करणं, आणि गावच्या जीवनाची सुंदर दृश्यं त्यांच्या व्हिडीओजमधून सादर करण्यात आली. शिरीष गवस यांचं निधन हे त्यांच्या कुटुंबासोबतच डिजिटल विश्वासाठीही मोठं नुकसान आहे. त्यांच्या कथा, संस्कृती आणि अन्नावरील प्रेम या माध्यमातून त्यांनी जे काही जपलं, त्याची आठवण प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com