मोबाईलप्रमाणेच आता टीव्हीवरही रिल्स उपलब्ध, कसं ते जाणून घ्या...

मोबाईलप्रमाणेच आता टीव्हीवरही रिल्स उपलब्ध, कसं ते जाणून घ्या...

टीव्हीवर रिल्स: आता मोबाईलप्रमाणे टीव्हीवरही रिल्स पाहण्याची संधी, जाणून घ्या कसे.
Published by :
Prachi Nate
Published on

सध्या सर्वत्र इंस्टाग्रामवरील रिल्स हा प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मोबाईलमधून आपल्या वेळेनुसार मोबाईलमध्ये आपल्या आवडीचे रिल्स पाहतात. सध्याची मुले मोबाईलवर जास्त वेळ रिल्स, शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात घालवतात. मात्र ह्याच रिल्स तुम्हाला टीव्हीवर पाहायला मिळाल्या तर, हे शक्य आहे.

देशातील 2 मोठ्या केबल टीव्ही कंपन्यांनी रिल्स बेस्ड, हॅथवे रिल्स आणि डेन रिल्स चॅनेल लॉन्च केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीच्या मालकीचे हॅथवे डिजिटल आणि डेन नेटवर्क्स यांनी हे काम सुरू केले असून ज्या गोष्टी मोबाईलवर पाहिल्या जातात त्या टीव्हीवर पाहता येणार आहेत. कंपन्या यातून युवा वर्गाला आकर्षिक करू इच्छिते ज्यांचा जास्त वेळ रिल्स बघण्यात जातो.

तुम्ही तुमच्या रिल्स, कॉमेडी व्हिडिओ किंवा रिल्स कंन्टेट या चॅनेलवर पाठवू शकता, तुमचा कन्टेंट चॅनेलकडून निवडला जाईल आणि तो टीव्हीवर प्रसारित करण्यात येईल. याचा फायदा असा आहे की, मुल आपला पुर्ण वेळ मोबाईलमध्ये रिल्स बघण्यात घालवतात त्यामुळे मुलं आता टीव्हीवर रिल्स पाहत आपली इतर काम देखील करु शकतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com