ताज्या बातम्या
Rekha Gupta : रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; आज घेणार शपथ
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर काल दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुप्ता यांच्या नावाची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून घोषणा करण्यात आली. तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली आहे.
भाजपच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
आज रेखा गुप्ता या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी रामलीला मैदानावर होणार आहे. तर परवेश शर्मा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार आहेत.