'त्या' चोरी प्रकरणात नातेवाईकच निघाले चोरटे!

'त्या' चोरी प्रकरणात नातेवाईकच निघाले चोरटे!

लाखोंचे ऐवज केले होत लंपास;मुख्यसूत्रधाराचा घेणार शोधचोरट्याकडे घराच्या कुलुपाची चाबी गेली कशी? तो चाबी देणारा कोण?

भूपेश बारंगे,वर्धा:

जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) शहरातील धान्य व्यापारी अशोक धुपचंद अग्रवाल यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यानी सोन्याचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्या प्रकरणाचा शोध पोलिसांनी सुरू केल्यानंतर चोरीची घटना उघडकीस येताच त्यातील चोरटे घरातील कुटुंब सदस्याचे नातेवाईक चोर निघाल्याने अग्रवाल कुटूंबियांच्या पायाखालची वाळू सरकताच आश्चर्यचा धक्का बसला आहे.

घरात लाखो रुपयांचे सोन्याचं ऐवज गुप्त ठिकणी ठेवलं होत.काचेच्या शोकेस मधील डॉल मध्ये सोनं ठेवलं होते,याची माहिती फक्त दोन व्यक्तींना होती.त्यानंतर तेच सोन त्याच ठिकाणच पळविल्याने पोलीस चक्रावले होते.या चोरी प्रकरणात नातेवाईक चोर असल्याचा संशय पोलीसाना आल्यावर त्यांनी सखोल चौकशी करत कसून माहिती काढली असता , ऐवज चोरणारे तीन चोर नातेवाईक निघाले. या चोरी प्रकरणात मदत करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेतल्या जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणात तीन जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.या मध्ये अनिष गोपाल अग्रवाल वय 18, महेश गाढवे वय 30, मुलाची आई अंजना गोपाल अग्रवाल वय 46 सर्व रा. मसोला, त.आर्णी ,जिल्हा.यवतमाळ येथील रहिवाशी आहे.त्यांना त्यांच्या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस हिसका दाखवत यातील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

अशोक अग्रवाल यांचे कुटुंब 13 जानेवारी रोजी सकाळी खासगी कामानिमित्त नागपूर येथे गेले असता.अशोक अग्रवाल हे एकटे घरी होते ,त्यानंतर दहा वाजता तेही घराला कुलूप लावून धान्य दुकानात निघून गेले होते.मात्र तीच संधी चोरट्यानी साधून घरातील मोठ्या प्रमाणात ऐवज व रोकड चोरून नेला.याबाबत कारंजा पोलिसात 15 लाखाचा ऐवज व रोकड चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली होती.मात्र त्यापेक्षाही जास्त प्रमाणात सोनं चोरीला गेल्याची चर्चा शहरात पसरली होती. मात्र सोनं नक्की चोरीला गेलं किती हे अद्यापही स्पष्ट झालं नसल तरी एवढं सोन चोरणारा चोर घरातील कुटुंब सदस्या नातेवाईक असल्याने अनेकांनी तोंडात बोट टाकली आहे.शहरात या चोरीचा छडा लागल्याची माहिती मिळताच, यात चोर फिर्यादीदाराचे नातेवाईक असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. या चोरी मध्ये दोन युवकांनी स्वतःच्या चेहरा बांधून हातात ग्लोज टाकून पूर्ण शरीर झाकून आले असल्याचे सीसीटीव्ही दिसून येत आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी शोध घेत चोरीचा उलगडा केला.पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर करडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंखे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत , सचिन मानकर, चंद्रकांत बुरंगे ,मनीष कांबळे, यशवंत गोहत्रे, लीलाधर उकंडे, गुड्डू थुल, उमेश खामनकर यांच्यासह इतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.

चोरट्याकडे घराच्या कुलुपाची चाबी कशी?

घराला कुलूप बंद असताना अज्ञात चोर घराचा कुलूप उघडून आता शिरला.त्यानंतर सोनं ऐवज जिथे होत तेच जागा तंतोतंत पाहून त्यातून सोनंच्या ऐवज चोरीला नेलं होत. यामुळे घरातील एखाद्या सदस्याने चोराला चाबी दिली असल्याचा संशयावरून पोलिसांनी अनेक नातेवाईक शोध घेत त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेत आरोपीने अटक केली आहे.या चोरी प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण त्याकडे आता पोलिसांचे लक्ष लागले असून या प्रकरणात पुन्हा कोणाला अटक होते,त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com