Jio Recharge : नववर्षाची धमाकेदार भेट! Jio कडून फायदेच फायदे असलेला ‘हॅपी न्यू इयर’चा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच; जाणून घ्या...
Reliance Jio has launched Happy New Year Plan 2026 : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास हॅपी न्यू इयर 2026 नावाचा नवीन प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट, कॉलिंग आणि मेसेजेससोबतच कमी किमतीत अनेक ओटीटी अॅप्सचा मोफत वापर करता येणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये अजूनही काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने सुमारे 500 रुपयांचा हा नवीन प्लॅन सादर केला असून, तो सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी किफायतशीर ठरू शकतो. या प्लॅनमध्ये नेमके काय फायदे मिळतात, ते सोप्या भाषेत पाहूया.
500 रुपयांच्या जिओ प्लॅनची वैधता आणि डेटा
हा जिओ प्रीपेड प्लॅन 28 दिवसांसाठी वैध आहे. यामध्ये दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 56 GB इंटरनेट डेटा वापरता येतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. ज्यांच्याकडे 5G मोबाइल आहे आणि जिओच्या 5G नेटवर्कच्या भागात राहतात, त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा चाही फायदा मिळणार आहे.
अनेक ओटीटी अॅप्सचा मोफत वापर
चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा प्लॅन खास आहे. या एका प्लॅनमध्ये 10 पेक्षा जास्त ओटीटी अॅप्स मोफत वापरता येणार आहेत. या प्लॅनमध्ये खालील ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस मिळतो:
Amazon Prime Video (Mobile)
YouTube Premium
JioHotstar (Mobile/TV)
Zee5
Sony Liv
Discovery+
Sun NXT
Planet Marathi
Lionsgate Play
Chaupal
FanCode
Hoichoi
जिओ जेमिनी आणि इतर अतिरिक्त फायदे
या प्लॅनसोबत जिओकडून 18 वर्षांवरील वापरकर्त्यांना 18 महिन्यांसाठी मोफत Google Gemini Pro प्लॅन दिला जात आहे, ज्याची किंमत सुमारे 35,000 रुपयांपेक्षा जास्त आहे.
याशिवाय पुढील फायदेही मिळतात:
50 GB मोफत Jio AI Cloud स्टोरेज
Jio Finance द्वारे Jio Gold वर 1% अतिरिक्त सूट
नवीन कनेक्शनसाठी 2 महिन्यांची मोफत JioHome ट्रायल
जर या प्लॅनची मुदत संपल्यानंतर Gemini सेवा सुरू ठेवायची असेल, तर किमान 349 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.

