Electricity : उकाड्यातून नागरिकांना दिलासा, वीजदर कपातीचा निर्णय

ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल 8 लाख ग्राहकांना होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

ऐन उन्हाळ्यात आता नागरिकांना दिलासा मिळणारब असल्याची बातमी समोर आली आहे. वीजदरामध्ये आता कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आर्थिक वर्ष 2025-26 ते आर्थिक वर्ष 2029-30 साठीच्या बहुवर्षीय दर प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता टाटा पॉवरकडून देखील वजी दरात कपात केली जाणार आहे, ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल 8 लाख ग्राहकांना होणार आहे.

पाच वर्षांमध्ये 28 टक्के एवढी वीज दरात कपात होणार आहे.येत्या एक एप्रिलपासून नवे वीज दर लागू होणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये 28 टक्क्यांपर्यंत वीज दरात कपात होऊ शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com