Maharashtra Flood Compensation : शेतकऱ्यांना दिलासा, आज खात्यात जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई
थोडक्यात
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
आज खात्यात जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. माहितीनुसार, राज्यात 52 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून स्पेशल पॅकेज देखील जाहीर करण्यात आले आहे. तर एक मोठी अपडेट आता समोर आली आहे.
या अपडेटनुसार, सरकारकडे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल (Panchnama Reports) सादर झाले असून कृषी विभागाकडून देखील एकूण अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आल्याने आता आजपासून (18 ऑक्टोबर) शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम वितरीत होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे तब्बल 52 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर आता 33 जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आले असून कृषीविभागाने (Agriculture Department) देखील एकूण अहवाल सादर केल्याने राज्यातील आता दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Devendra Fadnavis) यांनी आम्ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असं माध्यमांशी बोलताना म्हटले होते तर आता आजपासून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने राज्याती शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि पीएम केअर फंडमधून मदत करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.