Gold Rate News : सोनं झालं स्वस्त! सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घट; ग्राहकांसाठी चांगली बातमी
गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी दरामुळे सामान्य ग्राहक दागिने खरेदीपासून दूर गेले होते. आता मात्र दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. येत्या काळात सोने–चांदीच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता खरी ठरली आहे.
सोन्याच्या दरात गेल्या 24 तासात साधारण 1,000 रुपयांची घट नोंदवली असून सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या एका वर्षात सोन्याचा दर तब्बल 46 टक्क्यांनी वाढला होता. केवळ याच वर्षात 40 टक्क्यांची झेप घेत सोन्याचा दर 75 हजारांवरून थेट 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत गेला.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचा दर घसरताना दिसतो आहे. जळगावच्या स्थानिक बाजारपेठेत 24 कॅरेट सोन्याचा दर 113,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला असून, जीएसटीसह हा दर 1,17,000 रुपयांपर्यंत पोहचलेला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी उसळी नोंदवली गेली असून, एक किलो चांदीचा दर जीएसटीसह 1,42,000 रुपयांवर पोहोचला आहे.