Bombay High Court: कोर्टाचा मूर्तिकारांना दिलासा, POP गणेशमूर्तींना परवानगी; पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य
गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना, मुंबई उच्च न्यायालया Mumbai High Court ने एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून तयार होणाऱ्या गणेश Ganpati मूर्तींना परवानगी देत हायकोर्टा High court ने मूर्तिकारांना मोठा दिलासा दिला आहे.
न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, पीओपी POP मूर्ती तयार करता येतील आणि त्यांच्या विसर्जनासाठी सार्वजनिक तलावांचा वापर करता येईल. तसेच शहर व गाव पातळीवर पर्यायी विसर्जन तलावांची निर्मिती करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि पारंपरिक गणेशोत्सवाचा समतोल राखण्याचा प्रयत्न हायकोर्टाने केला आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो मूर्तिकारांना मोठा आधार मिळाला आहे. गणेशमूर्ती निर्मिती हा अनेक कुटुंबांचा प्रमुख व्यवसाय असून, मागील काही वर्षांपासून पीओपी POP मूर्तींवर असलेल्या बंदीमुळे ते अडचणीत होते. हायकोर्टाच्या निर्णयामुळे आता त्यांनी मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे.
मूर्तिकारांचे म्हणणे आहे की," शाडूच्या मातीपेक्षा पीओपी मूर्ती अधिक सुबक, हलक्या आणि आकर्षक असतात. पर्यावरणप्रेमी मात्र शाडूच्या मूर्तींना प्राधान्य देतात. हायकोर्टाने एकीकडे पीओपी मूर्ती बनवायला परवानगी देऊन दुसरीकडे बाप्पाच्या विसर्जनाची तयारी ही सार्वजनिक तलावांमध्ये करावी असा आदेश देऊन पर्यावरणाचा समतोल राखत मूर्तिकारांना आणि गणेश प्रेमींना न्याय दिला आहे" हा निर्णय उत्सवाच्या पारंपरिकतेचे जतन करताना पर्यावरण रक्षणालाही तितकेच महत्त्व देणारा ठरतो.