Republic Day 2026 : हा दिवस खरा 77 वा की 78 वा? जाणून घ्या आणि तयार
Republic Day 2026: देशभरात 2026 च्या प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू असताना एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यंदा भारताचा प्रजासत्ताक दिन नेमका 77 वा की 78 वा? अनेकांना आकडा जास्त वाटतो, पण यामागचे कारण साधे आहे.
भारताने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करून पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला. तो दिवसच “पहिला” मानला जातो. त्यानंतर दरवर्षी एक क्रमांक वाढत गेला. त्यामुळे २०२५ मध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन झाला आणि 2026 मध्ये सरळ 77 वा प्रजासत्ताक दिन येतो.
गोंधळ यासाठी होतो कारण लोक वर्षांची बेरीज करतात, पण येथे मोजणी वर्षांची नसून कार्यक्रमांची आहे. पहिला सोहळा 1950 मध्येच झाला होता, हे अनेकजण विसरतात. म्हणून निष्कर्ष स्पष्ट आहे – 2026 मध्ये भारत 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. नेहमीप्रमाणे नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर हा भव्य सोहळा पार पडेल आणि देशाची ताकद व विविधता जगासमोर मांडली जाईल.

