वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण
Admin

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण

आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले.
Published by :
Siddhi Naringrekar

आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जनतेचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com