Republic Day : कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा जयघोष! दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्रने पटकवला 'पहिला क्रमांक'
प्रजासत्ताक दिन 2026 च्या भव्य संचलनात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर सादर झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा पहिला क्रमांक मिळाला. गणेशोत्सवावर आधारित ही मांडणी प्रेक्षकांना आणि परीक्षकांना विशेष भावली.
महाराष्ट्राच्या चित्ररथात गणपती बाप्पा, अष्टविनायकांची प्रतिकृती, ढोल-ताशांचा नाद आणि उत्सवाचं रंगतदार चित्र दिसून आलं. “गणेशोत्सवातून आत्मनिर्भरता” हा संदेश या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आला होता. या कलाकृतीमागे तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर आणि श्रीपाद भोंगाडे यांचे योगदान होते.
या स्पर्धेत जम्मू-काश्मीरला दुसरा तर केरळला तिसरा क्रमांक मिळाला. संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे निकाल जाहीर केला.
यंदाच्या परेडमध्ये देशभरातून 30 चित्ररथ सहभागी झाले होते. स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भर भारत ही मुख्य थीम होती. गणेशोत्सव केवळ सण नाही, तर रोजगार, उद्योग आणि आर्थिक साखळी निर्माण करणारी ताकद आहे, हा विचार महाराष्ट्राने सुंदर पद्धतीने देशासमोर मांडला. आणि म्हणूनच महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट.
थोडक्यात
• प्रजासत्ताक दिन 2026 च्या भव्य संचलनात महाराष्ट्राने पहिली बाजी मारली आहे.
• नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर सादर झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा पहिला क्रमांक मिळाला.
• ही मांडणी गणेशोत्सवावर आधारित होती.
• प्रेक्षक आणि परीक्षक दोघांनाही ही मांडणी विशेष भावली.
• महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा आणि सर्जनशीलतेचा अभिमान यामध्ये झळकला.

