Kolhapur News : डिजिटल अरेस्टची धमकी देत कोल्हापुरातील निवृत्त प्राध्यापिकेला कोट्यवधींचा गंडा

मनी लॉन्ड्रीमध्ये सहभाग असल्याने डिजिटल आणि प्रत्यक्ष अटक करून बदनामी करू, अशी भीती घालून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापिकेला कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
Published by :
Rashmi Mane

मनी लॉन्ड्रीमध्ये सहभाग असल्याने डिजिटल आणि प्रत्यक्ष अटक करून बदनामी करू, अशी भीती घालून सायबर भामट्यांनी कोल्हापूरमधील सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे यांना 3 कोटी 57 लाख 23 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 18 एप्रिल ते 27 मे 2025 या दरम्यान घडला आहे. ट्रायचे अधिकारी आणि मुंबई पोलीस असल्याची बतावणी करून त्यांनी हा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. डोंगरे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, 40 दिवसात 15 वेळा डोंगरे यांनी परराज्यातील विविध 10 बँक खात्यांवर आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे रक्कम पाठवली असल्याचं समोर आले. याबाबतची माहिती पोलील निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com