Anil Parab On Yogesh Kadam : अनिल परबांचा मंत्री योगेश कदमांना दणका; काकांवर महसूल विभागाची कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये डेंटल कॉलेज परिसरात जगबुडी नदीतील गाळ बेकायदेशीरपणे टाकल्या प्रकरणी महसूल विभागाने मोठी कारवाई केली. यामध्ये गृहराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) योगेश कदम यांचे सख्खे चुलते अरुण गंगाराम कदम यांच्यावर तब्बल 6 लाख 93 हजारांचा दंड ठोठवला आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • अनिल परबांचा मंत्री योगेश कदमांना दणका...

  • योगेश कदमांच्या काकांवर महसूल विभागाची कारवाई..

  • जगबुडी नदीचा गाळ बेकायदेशीर टाकल्या प्रकरणी कारवाई...

  • अरूण कदमांना 6 लाख 93 हजारांचा दंड..

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये डेंटल कॉलेज परिसरात जगबुडी नदीतील गाळ बेकायदेशीरपणे टाकल्या प्रकरणी महसूल विभागाने मोठी कारवाई केली. यामध्ये गृहराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) योगेश कदम यांचे सख्खे चुलते अरुण गंगाराम कदम यांच्यावर तब्बल 6 लाख 93 हजारांचा दंड ठोठवला आहे. शेतात टाकण्यासाठी मंजूर झालेला गाळ प्रत्यक्षात डेंटल कॉलेज परिसरात बेकायदेशीररित्या टाकण्यात आला होता.

महसूल विभागाने या अनियमिततेची चौकशी करून कारवाई केली आहे. पावसाळी अधिवेशनात अनिल परब यांनी केला होता गौप्यस्फोट केला आहे. राज्य विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात उबाठा येथील नेते व माजी मंत्री अनिल परब यांनी सभागृहात पुरावे दाखवत या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती. अनिल परब यांच्या आरोपांना मिळाले अधिष्ठान. कारवाईनंतर अनिल परब यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल मंत्र्यांवर महसूल चोरीचे आरोप अनिल परब यांनी केले होते आणि आता महसूल विभागाच्या कारवाईमुळे त्या आरोपांना बळ मिळाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com