BJP Election Chief : भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी 'या' बड्या नेत्यांची निवड

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने मोठा निर्णय घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती...

  • खात्रीलायक सूत्रांची माहिती...

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात वर्षा निवासस्थानी बैठक...

  • बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला...

(Chandrashekhar Bawankule ) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने मोठा निर्णय घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर पुन्हा एकदा पक्षाने बावनकुळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2024 च्या निवडणुकीत 120 हून अधिक जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com