Pune Ring Road Project : रिंग रोड प्रकल्प रखडला; संरक्षण विभागाच्या जमिनीच्या ताब्यामुळे विलंब
Pune Ring Road Project : रिंग रोड प्रकल्प रखडला; संरक्षण विभागाच्या जमिनीच्या ताब्यामुळे विलंबPune Ring Road Project : रिंग रोड प्रकल्प रखडला; संरक्षण विभागाच्या जमिनीच्या ताब्यामुळे विलंब

Pune Ring Road Project : रिंग रोड प्रकल्प रखडला; संरक्षण विभागाच्या जमिनीच्या ताब्यामुळे विलंब

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प पुन्हा एकदा अडचणीत सापडला.

  • या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संरक्षण विभागाची जमीन अद्याप ताब्यात न आल्याने पहिल्या टप्प्यातील सोलू ते वडगाव शिंदे या मार्गासाठी निविदा प्रक्रिया थांबली आहे.

  • हा प्रकल्प 1997 मध्ये जिल्हा प्रादेशिक योजनेत समाविष्ट करण्यात आला होता.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संरक्षण विभागाची जमीन अद्याप ताब्यात न आल्याने पहिल्या टप्प्यातील सोलू ते वडगाव शिंदे या मार्गासाठी निविदा प्रक्रिया थांबली आहे. रिंग रोड प्रकल्पाचा उद्देश पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करणे आणि अवजड वाहनांना शहराबाहेर वळवणे हा आहे. हा प्रकल्प 1997 मध्ये जिल्हा प्रादेशिक योजनेत समाविष्ट करण्यात आला होता, मात्र अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. पहिल्या टप्प्यात सोलू–निरगुडे–वडगाव शिंदे या सुमारे 4.7 किमी लांबीच्या रस्त्याचे काम प्रस्तावित आहे.

पीएमआरडीएने भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला असून, वन आणि संरक्षण विभाग वगळता इतर जमिनींचा ताबा मिळालेला आहे. मात्र 23 हेक्टर संरक्षण विभागाच्या जागेचा प्रश्न कायम आहे. राज्य सरकारकडे जागा हस्तांतराचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या निविदा प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे, अशी माहिती महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. या प्रकल्पासाठी 145 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, रस्ता 65 मीटर रुंद आणि 128 किलोमीटर लांबीचा असेल. या रस्त्याचा काही भाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) विकसित करणार आहे.

संरक्षण विभागाची जमीन मिळेपर्यंत काम सुरू होणार नाही, त्यामुळे नागरिकांना नगर रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास अजून काही काळ सहन करावा लागणार आहे. रिंग रोडचे ग्रहण कायम राहिल्याने पुणेकरांची प्रतीक्षा अधिक वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com