Ind vs Eng, Rishabh Pant : भारताचा स्कोअर वाढवण्यात मोलाचा वाटा; ऋषभ पंतचे 7 वे कसोटी शतक, मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' विक्रम

Ind vs Eng, Rishabh Pant : भारताचा स्कोअर वाढवण्यात मोलाचा वाटा; ऋषभ पंतचे 7 वे कसोटी शतक, मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' विक्रम

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले.
Published by :
Team Lokshahi
Published on

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. दुसऱ्या दिवशी त्याने 178 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांसह 134 धावा करत शतक पूर्ण केले. यामुळे त्याने महेंद्रसिंह धोनीचा भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतक करणाऱ्या यष्टीरक्षकाचा विक्रम मोडला आहे.

शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल (101) आणि कर्णधार शुभमन गिल (147) यांनी शानदार शतकी खेळी करत भारताला भक्कम स्थितीत नेले. त्यांनी 129 धावांची भागीदारी करत संघाला 471 धावांचे लक्ष्य इंग्लंडला दिले. के. एल. राहुल (42) आणि नवोदित बी. साई सुदर्शन (0) लवकर बाद झाल्यानंतर ही भागीदारी महत्त्वाची ठरली.

कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय फलंदाजीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून जैस्वाल, गिल आणि पंत यांच्या खेळींनी या नव्या पिढीचा आत्मविश्वास दाखवून दिला. जैस्वालने संयम राखत शतक साजरे केले. तर गिलनेही दिवसाच्या शेवटी शतक गाठले. पंतने दुसऱ्या दिवशी आक्रमक शैलीत खेळ करत भारताची धावसंख्या अधिक भक्कम केली आणि संघाच्या विजयाच्या आशा वाढवल्या.

ऋषभ पंतचे हे शतक केवळ वैयक्तिक कामगिरीपुरते मर्यादित नाही, तर भारतीय क्रिकेटसाठीही एक नवा इतिहास घडवणारे ठरले आहे.

आशिया खंडाबाहेर एका डावात तीन भारतीय फलंदाजांची शतके -

1986 – सिडनी : सुनील गावस्कर, श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ

2002 – हेडिंग्ली : राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली

2006 – ग्रोस आयलेट : वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, मोहम्मद कैफ

2025 – हेडिंग्ली : यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत

हेही वाचा

Ind vs Eng, Rishabh Pant : भारताचा स्कोअर वाढवण्यात मोलाचा वाटा; ऋषभ पंतचे 7 वे कसोटी शतक, मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' विक्रम
Uttar Pradesh Crime : माता न तू वैरिणी! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्यांना आईनेच संपवलं
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com