Boris Johnson, Rishi Sunak
Boris Johnson, Rishi SunakTeam Lokshahi

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्तींच्या जावयाने ब्रिटीश पंतप्रधान पदासाठी घेतली आघाडी

एलिमिनेशन फेरीच्या मतदानात ऋषी सुनक यांना 25 टक्के म्हणजेच 88 मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत.
Published by :
Team Lokshahi

भारतीय वंशाचे ब्रिटिश नेते ऋषी सुनक इंग्लडच्या पंतप्रधानपदासाठीच्या दावेदारीत सर्वात पुढे आहे. लंडनमध्ये बुधवारी एलिमिनेशन राऊंडचे मतदान झाले. या फेरीत ऋषी सुनक 25 टक्के मतांसह शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. बोरीस जोन्सन यांनी राजीनामा दिल्यामुळे ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधान निवडीची प्रक्रिया सुरु आहे.

Boris Johnson, Rishi Sunak
शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय बदलला, आता नगराध्यक्ष पुन्हा जनतेतून

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मोठी आघाडी घेतली आहे. बुधवारी झालेल्या एलिमिनेशन फेरीच्या मतदानात ऋषी सुनक यांना 25 टक्के म्हणजेच 88 मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पेनी मॉर्डंट आहेत, ज्यांना 19 टक्के म्हणजेच 67 मते मिळाली आहेत. लिझ ट्रॉस यांना 14 टक्के म्हणजे 50 मते मिळाली. केमी बेदेनोक यांना 11 टक्के म्हणजेच 40 मते मिळाली आहेत. तर टॉम टुजेंट 37 मतांसह 5 व्या क्रमांकावर आहेत. भारतीय वंशाचे दुसरे उमेदवार सुएला ब्रेव्हरमन 9 टक्के मतांसह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना 32 मते मिळाली आहेत.

Boris Johnson, Rishi Sunak
Raj Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रिपद? राज ठाकरेंचा मोठा खुलासा

ऋषी सुनकसमोर काय आहेत आव्हान

ऋषी सुनक यांच्यासमोर कंझर्व्हेटिव्ह पक्षात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षातील नेता निवडण्याच्या प्रक्रियेत एक समिती असते. त्यांच्यांकडून पक्ष नेता निवडण्यासाठी त्रिस्तरीय प्रक्रिया असते. त्यात नामांकन, एलिमिनेशन आणि अंतिम निवड आहे. नामांकन झाले आहे आता एलिमिनेशन राऊंड सुरू आहे. ऋषी सुनक सध्या या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, त्याची स्पर्धा आणखी एका भारतीय राजकारणी सुएला ब्रेव्हरमनशी आहे. या टप्प्यात एकूण 8 उमेदवार होते. हे उमेदवार आहेत. त्यात सुएला ब्रेवरमॅन, ऋषि सुनक, लिज ट्रास, नधीम जहावी, पेन्नी मॉर्डान्ट, केमी बेडेनोक, जर्मी हंट आणि टॉम टुजैन्ट यांचा समावेश आहे. आता या स्पर्धेतून नधीम जहावी आणि जर्मी हंट बाहेर पडल्या आहेत.

Boris Johnson, Rishi Sunak
'भ्रष्ट', 'हुकूमशाही' शब्दांवर संसदेत असणार बंदी; विरोधक म्हणाले...

ऋषी सुनकसमोर काय आहेत आव्हान

ऋषी सुनक यांच्यासमोर कंझर्व्हेटिव्ह पक्षात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षातील नेता निवडण्याच्या प्रक्रियेत एक समिती असते. त्यांच्यांकडून पक्ष नेता निवडण्यासाठी त्रिस्तरीय प्रक्रिया असते. त्यात नामांकन, एलिमिनेशन आणि अंतिम निवड आहे. नामांकन झाले आहे आता एलिमिनेशन राऊंड सुरू आहे. ऋषी सुनक सध्या या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, त्याची स्पर्धा आणखी एका भारतीय राजकारणी सुएला ब्रेव्हरमनशी आहे. या टप्प्यात एकूण 8 उमेदवार होते. हे उमेदवार आहेत. त्यात सुएला ब्रेवरमॅन, ऋषि सुनक, लिज ट्रास, नधीम जहावी, पेन्नी मॉर्डान्ट, केमी बेडेनोक, जर्मी हंट आणि टॉम टुजैन्ट यांचा समावेश आहे. आता या स्पर्धेतून नधीम जहावी आणि जर्मी हंट बाहेर पडल्या आहेत.

कोण ऋषी सुनक

ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. 42 वर्षीय सुनक यांना फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री बनवण्यात आले होते. त्यानंतर तो बराच चर्चेत आला. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, एका आघाडीच्या ब्रिटीश बुकीने बोरिस जॉन्सन लवकरच राजीनामा देऊ शकतात आणि ऋषी सुनक त्यांच्या जागी नवीन पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकीत वर्तवले आहे.

ऋषी सुनक यांचे बालपण

ऋषी यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन, यूके येथे झाला. त्याचे वडील डॉक्टर होते तर आई दवाखाना चालवायची. ऋषी तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा. ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे होते. त्यांचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये झाला आणि आई उषा यांचा जन्म टांझानियामध्ये झाला. ऋषीच्या आजोबांचा जन्म पंजाब प्रांतात (ब्रिटिश भारत) झाला. नंतर 1960 च्या दशकात ते आपल्या मुलांसह ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com