Sindhudurg जिल्ह्यातील रिया आवळेकर ठरल्या देशातील पहिल्या महिला तृतीयपंथी शासकिय शिक्षिका

Sindhudurg जिल्ह्यातील रिया आवळेकर ठरल्या देशातील पहिल्या महिला तृतीयपंथी शासकिय शिक्षिका

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकिय शिक्षिका रिया आवळेकर यांनी मान मिळवला आहे. प्रशासनाने त्यांचं स्वागत देखील केलं. मात्र प्रवीण ते रिया असा संघर्षमय प्रवास प्रशासनामुळे काहीसा सुखर झाला आहे. हाच संघर्षमय प्रवास आपण पाहणार आहोत.
Published by :
Team Lokshahi

निसार शेख, चिपळूण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकिय शिक्षिका रिया आवळेकर यांनी मान मिळवला आहे. प्रशासनाने त्यांचं स्वागत देखील केलं. मात्र प्रवीण ते रिया असा संघर्षमय प्रवास प्रशासनामुळे काहीसा सुखर झाला आहे. हाच संघर्षमय प्रवास आपण पाहणार आहोत.

प्रवीण वारंग यांना लहानापासून शिक्षणात आवड होती. त्यांच्या काकीने त्यांना शिक्षक बनायला सांगितलं. त्यामुळे प्रवीण शिक्षक बनला. प्राथमिक शाळेपासून ते डी. एड पर्यत शिक्षण घेत असताना आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना प्रवीण च्या मनात खदखदत होती. लहान असल्याने घरात सांगू शकत नव्हते. मात्र मनाची कायम घुसमट होत होती. जस जस वय वाढत जात होत तसतस आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना अधिक होत होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करत प्रवीण पासून रिया आवळेकर असा प्रवास केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट गावा मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवीण शिक्षक म्हणून कार्यरत झाला. लहानपणीच आपण आपलं काहीतरी बनून अस्तित्व निर्माण करायचं, या उद्देशाने त्यांनी शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात करिअर सुरू केलं. मात्र मनात एकच खदखद होती ती आपण पुरुष नसून स्त्री असल्याची खदखद. ही मनात होणारी घुसमट त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तृतीयपंथी कल्याणकारी बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना सांगितली. त्यानंतर प्रशासनाने त्यांना योग्य ती मदत केली. देशातील पहिली तृतीयपंथी शिक्षिका असल्याचा आज अभिमान आहे. यासाठी मला माझं कुटुंब तसेच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने खूप सहकार्य केले. आज रिया आवळेकर या पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका असल्या तरी देखील काही तांत्रिक बाबी लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजोत नायर यांच्या इथे स्वीय सहाय्यक म्हणून तात्पुरत काम पाहत आहेत.

Sindhudurg जिल्ह्यातील रिया आवळेकर ठरल्या देशातील पहिल्या महिला तृतीयपंथी शासकिय शिक्षिका
'हर घर तिरंगा' अंतर्गत अमरावती महानगरपालिका तर्फे रॅलीचे आयोजन
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com