Rohit Arya Case : रोहित आर्या प्रकरणात नवा खुलासा; एपीआय अमोल वाघमारे नोंदवला जबाब

या प्रकऱणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित आर्याचा एनकाउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • रोहित आर्यावरील गोळीबार प्रकरण

  • या प्रकऱणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • गोळीबार करण्याचा निर्णय परिस्थिती पाहून

  • एपीआय अमोल वाघमारे यांची जबाबात माहिती

(Rohit Arya ) मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं होतं. . रोहित आर्या असे त्या व्यक्तीचं नाव होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाई करत काही तासांतच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या प्रकरणामुळे संपुर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला.त्याने सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. पोलीस स्टुडिओच्या बाथरूममधून आत शिरले. यावेळी रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत आरोपीला छातीच्या डाव्या आरोपीला गोळी लागली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणतात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या प्रकऱणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित आर्याचा एनकाउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला. त्यांनी असं सांगितले की, "रोहित आर्यावर गोळी झाडण्याचे आदेश न्हवते त्यावेळी परिस्थिती पाहून गोळीबार केला." एपीआय अमोल वाघमारे यांची जबाबात माहिती दिली. रोहित आर्याच्या पत्नीचाही जबाब गुन्हे शाखा नोंदवणार आहेत. तसेच गुन्हे शाखा रोहित आर्याचे सर्व आर्थिक व्यवहारही तपासणार असल्याची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com