'...यामुळे भाजप 50वर्ष सत्तेत येऊ शकली नाही' रोहित पवार यांचं वक्तव्य

'...यामुळे भाजप 50वर्ष सत्तेत येऊ शकली नाही' रोहित पवार यांचं वक्तव्य

इंदापुरात महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात आमदार रोहित पवार यांनी भाजपसह अजित पवारांवर देखील टीकास्त्र डागलं आहे.
Published by :
shweta walge

इंदापुरात महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात आमदार रोहित पवार यांनी काहीजण दमदाटी करतात.फोन करून कार्यक्रमाला जाऊ नका अशा धमक्या देत आहेत. साहेबांवर सोशल मीडिया बद्दल जर चांगलं काही लिहिलं, तर त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे तुतारीचा आवाज मलिदा गॅंगच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. असं म्हणाले तसंच ज्या व्यक्तीमुळे आपण मोठं झालो, त्या व्यक्तीला तुम्ही विसरून गेले असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर देखील टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यात भाजप 50 वर्षे केवळ पवार साहेबांमुळे सत्तेत येऊ शकले नाही. आंबेगाव येथील एका कंपनीने आदिवासी शाळेला तब्बल 143 रूपये किमतीने दूध विकले. शरद पवारांनी आवल्याला काय दिले उभ्या जनतेला माहीत आहे. इंदापुरातील कामात 20 टक्के कमिशन घेतले असल्याचं पत्र मला मिळालं? हे खुप शोकिंग आहे. 98 टक्के लोक बाजूला राहील आहे आणि केवळ 2 टक्के लोकांचा विकास चालू आहे.

ते पुढे म्हणाले की, आमच्यावर कारवाई झाली, मात्र तुम्हाला फोन आला की तुम्ही घाबरता? कारवाई होणार असेल तरी मी विचार सोडले नाहीत. मी बच्चा आहे, मात्र मनाने सच्चा आहे.

काहीजण पवार साहेबांच वय काढतात, त्यांच्यावर टीका करतात त्यामुळे याचा एकदा विचार करा. भाजपचा एकही खासदार नाही ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला नाही.

मराठी माणूस स्वाभिमानी असतो तो दिल्ली पुढे झुकत नाही. बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा मातोश्रीवर तिकीट वाटप केले जायचे आता परिस्थिती वेगळी आहे.

उदयनराजे यांना दोन ते दिन दिवस वेळ दिला जात नाहीत. मात्र एक खासदार असलेल्या पक्षाला वेळ दिला जातो. तुम्ही आमचे नेते घेऊ शकता, मात्र आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातील जनता विकत घेऊ शकत नाहीत. देशाला दाखवून द्यायचे आहे, त्यामुळे भाजपच्या प्रतिगामी विचाराला जिंकू देणार नाही.

माझ्या लहान मुलांना देखील ED माहीत झालेली आहे. माझी मुलं देखील मला आता तुम्ही जर पणजोबा साथ सोडली तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाहीत.अशी मला बोलत आहेत.

सत्तेसाठी स्वहितासाठी पक्ष सोडून गेला असला तरी तुम्हाला विचार काय कळणार ? पैशापेक्षा लोकांची ताकद मोठी असते..यावेळी पवार साहेब आसनी ताई तुमच्या सोबत आहोत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com