राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवारांचं मोठं विधान म्हणाले, राजकारणात येऊन चूक...
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहीत पवार म्हणाले की, “हे सर्व पाहता इतर ठिकाणी हे प्रकार यशस्वी होऊ शकतात, पण महाराष्ट्रात हे जमणार नाही. कारण लोक हे जमू देणार नाहीत. लोकनेत्यांनी सुरू केलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष भाजपाला महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्यापासून रोखू शकत होत्या. हे भाजपाला माहिती असावं.
तसेच आज लोकांचा भाजपाला पाठिंबा राहिला नाही. त्यामुळे भाजपा शिवसेनेला जसं फोडलं तसं राष्ट्रवादी काँग्रेसला फोडेल असा अंदाज होता. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारबरोबर जातील याचा अंदाज कुणालाही नव्हता, पण भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडेल याचा नक्कीच काही प्रमाणात अंदाज होता. असे रोहीत पवार म्हणाले.