भाजपा, शिंदेगटाकडून पैशांचा पाऊस, मात्र विजय महाविकास आघाडीचा - रोहीत पवार
Admin

भाजपा, शिंदेगटाकडून पैशांचा पाऊस, मात्र विजय महाविकास आघाडीचा - रोहीत पवार

कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.

कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहीत पवार म्हणाले की, भाजप, शिंदेगटाकडून पैशांचा पाऊस, मात्र विजय महाविकास आघाडीचा असे रोहीत पवार म्हणाले.

तसेच दोन्हीकडे निकाल हा लोकशाहीच्या बाजून लागले. जो काही राजकीय भूकंप होणार आहे तो तुम्हाला लोकांच्या माध्यमातून निकालाच्या मदतीने पाहायला मिळेल. असे रोहीत पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com