Rohit Pawar : निलेश लंके हे पुढचं खासदार होतील असा विश्वास मला तरी वाटतो

Rohit Pawar : निलेश लंके हे पुढचं खासदार होतील असा विश्वास मला तरी वाटतो

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले की, निलेश लंके जेव्हा अजितदादांकडे होते. तेव्हा सातत्याने लोक त्यांना भेटत होती. मतदार भेटत होते.

तसेच इतर आमदार आहेत ज्यांना लोक हेच म्हणत आहेत की तुम्ही परत साहेबांबरोबर गेला पाहिजे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक दौरा केला होता मतदारसंघामध्ये खासदारकीच्या तिथे लोकांचे मत आलं की तुमच्याबरोबर आम्ही आहोत जर तुम्ही साहेबांबरोबर असाल. त्यानंतर मग त्यांनी इच्छा व्यक्त केली लोकसभा लढायची.

लोकांच्या सपोर्टने आणि आता साहेबांबरोबर आल्यामुळे त्यांचे मताधिक्य चांगलं असेल. तिथे नक्कीच लढत एका बलाढ्य शक्तीविरोधात सामान्यांची शक्ती होईल आणि त्या सामान्य शक्तीच्या मागे सामान्य लोकं भक्कमपणे उभं राहून निलेश लंके हे पुढचं खासदार होतील. असा विश्वास मला तरी वाटतो. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com