अजित पवार यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशी; रोहित पवार म्हणाले...

अजित पवार यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशी; रोहित पवार म्हणाले...

इंदापूर येथे बोलताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होते.
Published by :
Siddhi Naringrekar

इंदापूर येथे बोलताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होते. पाहिजे तो निधी देतो पण आमच्यासाठी कचाकचा बटण दाबा. असे अजित पवार म्हणाले होते. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवारांवर कारवाई व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.

आता अजित पवारांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची दखल घेतल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार!

तसेच ते पुढे म्हणाले की, आता कोणत्याही दबावाला बळी न पडता याप्रकरणी निवडणूक आयोग निष्पक्षपणे चौकशी करुन नियमाप्रमाणे कारवाई करेल आणि यातूनच आपण निष्पक्ष व स्वायत्त आहोत हे आपल्या कृतीतून दाखवून देईल, ही अपेक्षा! असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com